Join us

गोराईत रिक्षाचालकाची आत्महत्या

By गौरी टेंबकर | Updated: December 6, 2023 00:14 IST

रीक्षा खाडीत पडताच तेथील बोट चालकाने लगेच माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांना फोन केला. शेट्टी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बोरिवली पोलीस, अग्निशामक दल यांना तेथे बोलावून घेतले.

मुंबई: बोरिवलीच्या गोराई खाडी परिसरात येथे शुक्रवार रात्री साधारण १० वाजण्याच्या   प्रवीण रघुनाथ पाटकर (६९) यांनी गोराई खाडीच्या मुख्य प्रवेशद्वारातून जोरदार वेगात रिक्षा चालवत खाडीमध्ये रिक्षासकट उडी मारून आत्महत्या केली. ते चारकोपच्या सेक्टर २ मध्ये राहत होते.

रीक्षा खाडीत पडताच तेथील बोट चालकाने लगेच माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांना फोन केला. शेट्टी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बोरिवली पोलीस, अग्निशामक दल यांना तेथे बोलावून घेतले. स्थानिक रहिवाशी व अग्निशमन दल कर्मचारी यांच्या मदतीने रिक्षा व मृत व्यक्ती यांना बाहेर काढण्यात आले. जी रिक्षा चालवून एक वयोवृद्ध व्यक्ती आपला उदर-निर्वाह चालवत होतात्याच रिक्षामध्ये त्यांनी आपला असा दुर्दैवी अंत केला का केला याचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र या अतिशय दुःखद आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे बोरिवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबईपोलिसअग्निशमन दल