Rhea Chakraborty shares WhatsApp messages with Sushant Singh Rajput in which he called sister manipulative | Sushant Singh Rajput Suicide: ‘सुशांत माझ्यामुळे नाही, तर बहिणीमुळेच त्रस्त’

Sushant Singh Rajput Suicide: ‘सुशांत माझ्यामुळे नाही, तर बहिणीमुळेच त्रस्त’

मुंबई : रिया चक्रवर्तीने रविवारी सुशांतसिंह राजपूतसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप संवादाचे स्क्रीनशॉट व्हायरल केले आहेत. यात सुशांतने बहिणीकडून मिळणारी वागणूक व रियासोबतच्या समाधानी नात्याबाबत रियाशी संवाद साधला. सुशांत माझ्यामुळे नाही तर बहिणीमुळेच त्रस्त झाल्याचा आरोप हे स्क्रीनशॉट दाखवून रियाने केला आहे.

स्क्रीनशॉटमध्ये, माझी बहीण, माझ्या मित्रांना आणि रूममेट असणाऱ्या सिद्धार्थ पिठाणीला माझ्याविरुद्ध भडकावत असल्याचे सुशांत रियाला सांगत आहे. तर रिया आणि तिचा भाऊ शोविकबद्दल तो प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. तुझे कुटुंब मस्त आहे. तू मला नेहमीच योग्य मार्ग दाखवते. तू माझ्या जवळ आहेस. मी खूप समाधानी असल्याचे तो बोलत आहे. पुढे तू हसताना छान दिसतेस. मला अशीच आवडतेस, असेही सुशांतने म्हटले आहे. रियाने सुशांतला चौकशीसाठी केलेल्या संदेशात सुशांतने मी ठीक नाही, माझी बहीण सिडला (सिद्धार्थ पिठाणी) भडकावते. त्यावरून मी तिला तिच्या वागणुकीबद्दल शिक्षा केली, असे सुशांतने म्हटले आहे. यामुळे तो दु:खी झाल्याचेही त्याने नमूद केले आहे.

बहीण प्रियंकाऐवजी चूकून रियाला पाठवलेल्या दुसºया एका संदेशात त्याने म्हटले आहे की, दारूच्या नशेत केलेल्या छेडछाडीनंतर तू गेम खेळत आहेस. तो एक गुन्हा आहे. तुला तुझ्या अहंकारामुळे काहीच दिसत नसेल तर देवच तुझे भले करो. मी कोणाला घाबरत नाही, असे तो यात बहीण प्रियंकाला सांगत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rhea Chakraborty shares WhatsApp messages with Sushant Singh Rajput in which he called sister manipulative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.