Join us  

निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरण : कांदिवलीत पाच शिवसैनिकांना 'घुसखोरी' प्रकरणी अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 1:14 PM

समतानगर पोलिसांनी मंगळवारी एकूण पाच जणांना अटक करत न्यायालयात हजर केले. 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड केल्याप्रकरणी मदन शर्मा (६५) या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी पाच जणांना घुसखोरीप्रकरणी अटक केली आहे.

समतानगर पोलिसांनी मंगळवारी एकूण पाच जणांना अटक करत न्यायालयात हजर केले.  शाखाप्रमुख कमलेश कदम यांच्यासह एकूण सहा शिवसैनिकांकडून शर्मा यांना मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या इमारत परिसरात घडलेल्या या घटनेचे तीव्र राजकिय व प्रतिसाद उमटले आणि स्थानिक आमदार तसेच शर्मा यांच्या नातेवाईकांसह विरोधी पक्ष नेत्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्या कार्यालयासमोर धारणा आंदोलनही केले. सीसीटीव्ही पडताळणी नंतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समतानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. 

शर्मा हे निवृत्त नौदल अधिकारी ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात राहत असुन  ९ सप्टेंबर, २०२० रोजी उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र महानगर १ नामक व्हॉट्सअप गृपवर शेअर केले. त्याच रागात शर्मा यांच्या इमारतीत घुसून शिवसैनिकांकडून त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाण प्रकरणी या सहा जणांना शुक्रवारी रात्रीच पोलीस ठाण्यात जमीन देण्यात आला होता. शर्मा यांनी फॉरवर्ड केलेल्या व्यंगचित्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या फोटोला नमस्कार करताना दिसत होते. ज्यामुळे हा प्रकार घडला.

टॅग्स :गुन्हेगारीउद्धव ठाकरेमुंबईकांदिवली पूर्व