Join us
Daily Top 2Weekly Top 5

आज जाहीर होणार एमबीए, एमसीए सीईटचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 18:39 IST

राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल आज (शनिवार) सकाळी ११ वाजता जाहीर होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे. 

मुंबई : राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल आज (शनिवार) सकाळी ११ वाजता जाहीर होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे. राज्यभरात असलेल्या सुमारे ३६ हजार जागांसाठी ही प्रवेश पूर्व परीक्षा १४ व १५ मार्च रोजी घेण्यात आली होती. या   परीक्षेला राज्यभरातून तब्बल १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थी बसले होते. या परीक्षांचा निकाल ३१ मार्च रोजी अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनमुळे तो जाहीर करण्यात आला नव्हता , आता मात्र तो आज जाहीर होणार आहे. 

 

आज निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवत्तेनुसार या विद्यार्थ्यांचे ३६ हजार जागांवर प्रवेश होणार आहेत. गेल्यावर्षी याच प्रवेश परीक्षेत बोगस प्रवेश आढळल्याने  यंदा ‘एमबीए’, ‘एमएमएस’ प्रवेशासाठी अखिल भारतीय उमेदवारी प्रकारात राज्य सरकारची ‘सीईटी’, ‘सीमॅट’ आणि राष्ट्रीय स्तरावर होणारी ‘कॅट’ परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमासाठी इतर कोणतीही खासगी व्यवस्थापनाची प्रवेशपरीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही, असे याअगोदरच सीईटी सेलने सष्ट केले आहे.

टॅग्स :शिक्षणशिक्षण क्षेत्र