मुंबई - एका अधिकाऱ्याने विभागात तीन वर्षे कार्यरत असणे अपेक्षित असताना मुंबई महापालिकेच्या एफ-उत्तर (वडाळा-माटुंगा) विभागात गेल्या दोन वर्षांत तीन सहायक आयुक्त बदलण्यात आले आहेत. त्यातच या विभागातील सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांच्या बदलीला नागरिकांनी विरोध करत निदर्शनेही केली. हा निर्णय राजकीय दबावाने झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होत असताना भाजपा आमदार तमिल सेल्वन आणि ज्येष्ठ नगरसेवक रवी राजा यांनी मात्र बदलीच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे.
ऐन विधानसभेच्या अधिवेशन काळात शुक्ला यांनी येथील फेरीवाले आणि फुल व्यावसायिक यांच्यावर कारवाई केली होती. त्यावेळी भाजप आमदार कॅ. तमिल सेल्वन यांनी शुक्ला यांची बदली झाल्याशिवाय आपण सभागृहात येणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर ते दोन दिवस सभागृहात आले नव्हते. या विभागात एप्रिल २०२३ ते जून २०२४ या काळात चक्रपाणी अल्ले यांनी सहायक आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळली.
संस्थाच सर्वोच्च, व्यक्ती नव्हे : रवी राजा भाजपचे रवी राजा यांनी मात्र बदलीचे समर्थन करताना म्हटले आहे की, संस्था सर्वोच्च असते आणि तसेच असले पाहिजे. पण संस्थेपेक्षा स्वतःला मोठे समजणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्याच अविर्भावातून काही अधिकारी सामान्य आणि गरीब लोकांवर कारवाई करत होते.
‘राजकीय दबावाचा बसला फटका’त्यानंतर पृथ्वीराज चौहान यांनी जून २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात या पदावर काम केले. त्यानंतर शुक्ला यांची या पदावर नियुक्ती झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांचीही बदली झाली. सायन-माटुंगा निवास मंचाने ही बदली राजकीय दबावातून झाल्याचा आरोप केला. शुक्ला यांनी लोकांना भेटण्यास, त्यांच्या नागरी समस्या समजून घेण्यास आणि या समस्या सोडवण्यास तत्परतेने सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांची बदली धक्कादायक आहे, असे मंचाचे म्हणणे आहे.२ वर्षांत तीन अधिकाऱ्यांच्या बदलीने असंतोष