निवासी डॉक्टरांचा ७ ऑगस्टला बेमुदत संप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 06:47 IST2019-08-06T01:10:32+5:302019-08-06T06:47:02+5:30

वारंवार पत्रव्यवहार करून निराशा पदरी आलेल्या डॉक्टरांनी आता आपत्कालीन वैद्यकीय सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ​​​​​​​

Resident doctor expires on August 7 | निवासी डॉक्टरांचा ७ ऑगस्टला बेमुदत संप

निवासी डॉक्टरांचा ७ ऑगस्टला बेमुदत संप

मुंबई : निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेकडून ७ ऑगस्टला राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार पत्रव्यवहार करून निराशा पदरी आलेल्या डॉक्टरांनी आता आपत्कालीन वैद्यकीय सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सेंट्रल मार्डच्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासन वारंवार डॉक्टरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अजून किती काळ केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे आता शासनासमोर संपाचे हत्यार उगारण्याशिवाय पर्याय नाही. मागण्या मान्य होईपर्यंत राज्यातील निवासी डॉक्टर सेवेत हजेरी लावणार नाहीत. अकोला, आंबेजोगाई, लातूर, नागपूर या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत अनेकदा विद्यावेतन वेळेवर मिळत नाही. त्याचप्रमाणे, क्षयरोग झालेल्या निवासी डॉक्टरांना आणि महिला डॉक्टरांना प्रसूती रजा मिळण्यासाठी नियम असला पाहिजे. या संदर्भात सेंट्रल मार्डची अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले की, या संपामध्ये इतर सुविधांसह आपत्कालीन सुविधादेखील बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता आमचा संयम न पाहता, राज्य शासनाने त्वरित मागण्या मान्य कराव्यात.

Web Title: Resident doctor expires on August 7

टॅग्स :doctorडॉक्टर