राज्यातील ८ आदिवासीबहुल जिल्ह्यांत ‘एसईबीसी’ला आरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 09:30 IST2025-08-01T09:30:20+5:302025-08-01T09:30:45+5:30
सुधारित आरक्षण लागू करण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षत मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली होती.

राज्यातील ८ आदिवासीबहुल जिल्ह्यांत ‘एसईबीसी’ला आरक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आदिवासीबहुल ८ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क, गट-ड संवर्गातील पदांसाठी राज्य सरकारने सुधारित आरक्षण व बिंदूनामावली निश्चित केली आहे. एसईबीसीसह नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत सुधारित आरक्षण लागू करण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षत मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली होती.
जिल्हानिहाय लोकसंख्येच्या आधारावर नव्याने करण्यात आलेली आरक्षणाची रचना अशी
जिल्हे अनु. अनु. वि.जा. भ.ज. भ.ज. भ.ज. विशेष इतर एसईबीसी ईडब्ल्यूएस खुला
जाती जमाती (अ) (ब) (क) (ड) मागास मागास प्रवर्ग
नाशिक, धुळे,
नंदुरबार, पालघर १०% २२% ३% २.५% ३.५% २% २% १५% ८% ८% २४%
यवतमाळ १२% १४% ३% २.५% ३.५% २% २% १७% ८% ८% २८%
चंद्रपूर १३% १५% ३% २.५% ३.५% २% २% १९% ८% ८% २४%
गडचिरोली १२% २४% २% २% २% २% २% १७% ८% ८% २१%
रायगड १२% ९% ३% २.५% ३.५% २% २% १९% १०% ९% २८%