मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 08:15 IST2026-01-01T08:14:25+5:302026-01-01T08:15:02+5:30
रिपब्लिकनने स्वबळाचा नारा दिला होता...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
मुंबई : भाजप व शिंदेसेनेकडून प्रत्येकी ६ जागा देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा मिळाल्याचे खा. रामदास आठवले यांनी म्हटले आहे. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नाराजी दूर झाल्याची माहिती आठवलेंकडून देण्यात आली. रिपब्लिकनने स्वबळाचा नारा दिला होता.
आठवलेंनी फडणवीस यांच्याकडे १७ जागांची यादी दिली. त्यापैकी १२ जागा सोडण्यात येतील, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांना निर्देश दिले. याशिवाय, शिंदेसेनेकडून काही जागा रिपब्लिकनला देण्यात येतील, अशी माहिती आठवलेंनी दिली. १७ पैकी १२ जागा दोन्ही पक्ष सोडतील व त्यांचे उमेदवार अर्ज मागे घेतील. अन्य जागांवर रिपब्लिकन मैत्रीपूर्ण लढत देईल व १९७ जागांवर पाठिंबा दिल्याची व महायुतीचा घटकपक्ष म्हणून उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले.