Join us

अटल सेतूवर नूतनीकरण; आयआयटी मुंबईची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 08:47 IST

Atal Setu News: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अटल सेतूवर पृष्ठभाग नूतनीकरण आणि पदपथ पुनर्बाधणीचे काम हाती घेतले आहे. पुलाची मजबुती आणि अधिक सुकर प्रवासासाठी हे काम करण्यात येत आहे. वाहतूक बंद न करता, हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अटल सेतूवर पृष्ठभाग नूतनीकरण आणि पदपथ पुनर्बाधणीचे काम हाती घेतले आहे. पुलाची मजबुती आणि अधिक सुकर प्रवासासाठी हे काम करण्यात येत आहे. वाहतूक बंद न करता, हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. सुरुवातीला तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांच्या पृष्ठभागाची पुनर्बाधणी करण्यात येईल, त्यानंतर उर्वरित दोन मार्गिकांवर काम केले जाईल.

नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर, विशेषतः अवजड वाहनांसाठी पुलावरील १०.४ किमी पुढे असलेल्या बाहेरील मार्गिकांवर काही ठिकाणी पृष्ठभागाची झीज आढळल्यानंतर, एमएमआरडीएनेतांत्रिक परीक्षण केले. पावसाळ्यात सुरक्षा कायम राखण्यासाठी मॅस्टिक अॅस्फाल्ट वापरून दुरुस्तीची कामे केली होती. आता पावसाळा संपल्यानंतर, पूर्ण क्षमतेने पृष्ठभाग नूतनीकरणाच्याकामांना सुरुवात केली. साहित्याची गुणवत्ता, मिश्रण रचना ते जागेवरील नियंत्रण या प्रत्येक टप्प्यावर आयआयटी मुंबईच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. हा प्रकल्प दोषदायित्व कालावधी अंतर्गत असल्याने, या कामांचा खर्च कंत्राटदार उचलणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Atal Setu Undergoes Renewal; IIT Mumbai Provides Assistance

Web Summary : MMRDA undertakes surface renewal and footpath reconstruction on Atal Setu to enhance durability and ride quality. Work proceeds in phases without traffic disruption, guided by IIT Mumbai. The contractor bears the cost under the defect liability period.
टॅग्स :मुंबईआयआयटी मुंबई