Join us  

ठाकरेपुत्राचं नवसंशोधन, कोयनेच्या खोऱ्यात पालींच्या दोन नव्या प्रजाती शोधल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 11:02 AM

महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व कलाक्षेत्र गाजवणाऱ्या ठाकरे घराण्यानं आता वन्यजीव क्षेत्रावरही आपला ठसा उमटवताना दिसत आहेत.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव असलेल्या ठाकरे कुटुंबातील दुसरे चिरंजीव हे वन्यजीव व प्राणीमित्र आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे थोरले चिरंजीव आदित्य ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला. तर, आदित्य यांचे लहान बंधु तेजस ठाकरे हे खेकडा प्रजातीवर संसोधन करत आहेत. नुकतेच, तेजस आणि त्यांच्या टीमने पालींच्या दोन नवीन प्रजाती शोधल्या आहेत. 

कोयनेच्या खोऱ्यातून सापडलेल्या पालीच्या प्रजातीला ‘निपास्पिस कोयनाएन्सिस’ आणि आंबाघाटामधून सापडलेल्या प्रजातीला ‘निमास्पिस आंबा’ अशी नावं देण्यात आली आहेत. तेजस ठाकरे, इशान अगरवाल आणि अक्षय खांडेकर या तिघांची टीम गेल्या वर्षी पावसाळ्यात संशोधनासाठी गेली होती. यावेळी त्यांनी पालींचे सॅम्पल गोळा करून त्यांच्या डीएनएचा अभ्यास केला. आमच्या टीमच्या या संशोधनाबद्दल मला आनंद होत असल्याचे तेजस यांनी म्हटले. दरम्यान, पालींच्या या नव्या प्रजातींच्या संदर्भातील संशोधन ‘झूटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झालं आहे.

महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व कलाक्षेत्र गाजवणाऱ्या ठाकरे घराण्यानं आता वन्यजीव क्षेत्रावरही आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. यापूर्वी तेजस यांनी खेकड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावला असून हा खेकडा ‘ठाकरे’ यांच्याच नावानं ओळखला जात आहे. लाल-जांभळ्या व भगव्या रंगाच्या या खेकड्याला ‘ग्युबर्नेटोरियन ठाकरे’ असं नाव देण्यात आलं होतं. तेजस हे कला शाखेचे विद्यार्थी असून वन आणि वन्यजीवांच्या अभ्यासाची आवड आहे. याच आवडीतून त्याची विविध ठिकाणी भ्रमंती सुरू असते. कोकणातील जंगलात दुर्मिळ सापांच्या जाती शोध घेण्यासाठी गेलेल्या तेजसला सावंतवाडीजवळच्या रघुवीर घाटावर असलेल्या धबधब्यात खेकड्यांच्या पाच नव्या जाती सापडल्या. त्यानंतर, आता कोल्हापूरातील आणि साताऱ्यातील घाटींमध्ये पालींच्या दोन नवा प्रजातींचे संशोधन तेजस आणि टीमने केले आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेप्राण्यांवरील अत्याचारकोल्हापूरकोयना धरण