Join us
Daily Top 2Weekly Top 5

मास्क काढला, दंड बसला; तीन दिवसांत १८ हजार जणांवर पाेलीस कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 06:42 IST

तीन दिवसांत १८ हजार जणांवर पाेलीस कारवाई

मुंबई : कोरोना काळात विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध पालिकेबरोबर पोलिसांकडूनही धडक कारवाई सुरू झाली आहे. तीन दिवसांत पोलिसांनी अशा १८ हजार जणांवर कारवाई करून दंड वसूल केला.

पोलिसांकडून गर्दीची ठिकाणे, बाजार, पर्यटनस्थळ, रेल्वे, बसस्थानक तसेच रहिवासी इमारतींसह झोपडपट्टी भागात विनामास्क फिरणाऱ्यांची धरपकड सुरू आहे. यात, त्यांच्याकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. रविवारपासून पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली. यात एकूण १८ हजार जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.

अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

मुंबईत विनामास्क फिरल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल अशा अफवा पसरविल्या जात आहेत. प्रत्यक्षात केवळ २०० रुपये दंड आकारला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही केले.विनामास्क फिरणाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईदरम्यान  नागरिकांकडून वसूल केलेल्या दंडाच्या रकमेतून अर्धे पैसे पोलीस कल्याण निधीसाठी देण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका