‘केईएम’ नावातील एडवर्ड काढून टाका; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 10:01 IST2026-01-23T09:59:34+5:302026-01-23T10:01:15+5:30

गुलामीचे प्रतीक असलेली नावे काढण्याची गरज असल्याचे व्यक्त केले मत

Remove Edward from the name 'KEM'; Minister Mangalprabhat Lodha's suggestion | ‘केईएम’ नावातील एडवर्ड काढून टाका; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सूचना

‘केईएम’ नावातील एडवर्ड काढून टाका; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: के. ई. एम.मधील राजा एडवर्ड हे नाव गुलामगिरीचे प्रतीक आहे. त्यामुळे हे नाव बदलावे, अशी सूचना मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. एडवर्ड नाव कायम ठेवण्याची काय गरज आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाला १०० वर्षांपेक्षा जास्त काळ गुलाम बनवले, त्यांची पूजा करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. गुलामीचे प्रतीक असलेली नावे काढून स्वाभिमान दाखवणारी नावे देशात जिथे गरज आहे तिथे केली जात आहेत. येथेही महापालिका योग्य निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयाच्या १०० व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. रुग्णांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानस्नेही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, सरकारच्या आरोग्य योजनांची माहिती नागरिकांना देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी आ. कालिदास कोळंबकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त  शरद उघडे, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये यांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. संगीता रावत उपस्थित होते.

‘रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली’ सुविधेचा प्रभावीपणे वापरासाठी रुग्णालय सज्ज आहे. लवकरच संपूर्ण क्षमतेने याचा वापर सुरू होईल, असे उपायुक्त उघडे म्हणाले. २ हजार खाटा असून, दररोज ६ हजार बाह्यरुग्ण हाताळण्याची क्षमता आहे. लवकरच ‘सर्व्हिस टॉवर’ निर्माण करण्यात येत आहे. त्याद्वारे विविध चाचण्यांची सुविधा उपलब्ध होईल, असे डॉ. संगीता रावत म्हणाल्या. रुग्णालयाचे रुग्णांवर उपकार आहेत. हे ऋण मानायला आल्याचे खा. अरविंद सावंत म्हणाले. सरकारने रुग्णालयाकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.  

Web Title : केईएम नाम से 'एडवर्ड' हटाएं: मंत्री मंगल प्रभात लोढ़ा का सुझाव

Web Summary : मंत्री लोढ़ा ने केईएम अस्पताल का नाम बदलने का सुझाव दिया, 'एडवर्ड' को गुलामी का प्रतीक बताया। उन्होंने अस्पताल के शताब्दी समारोह में सुविधाओं, प्रौद्योगिकी और सरकारी योजनाओं के बारे में जागरूकता की वकालत की।

Web Title : Remove 'Edward' from KEM name: Minister Mangal Prabhat Lodha suggests

Web Summary : Minister Lodha suggests renaming KEM Hospital, deeming 'Edward' a slavery symbol. He advocated for facilities, technology, and government scheme awareness at the hospital's centenary celebration.