कमला मिल आगीची आठवण : उपाहारगृहांच्या झाडाझडतीने होणार नववर्षाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 03:57 AM2018-12-25T03:57:09+5:302018-12-25T03:57:23+5:30

नववर्षाच्या स्वागताचे काउंटडाउन सुरू असताना, आगीच्या सत्राने मुंबईकरांच्या मनात पुन्हा एकदा धडकी भरली आहे. रविवारी दिवसभरात पाच ठिकाणी छोट्या-मोठ्या आगीच्या घटना घडल्या.

Remembrance of Kamala Mill fire | कमला मिल आगीची आठवण : उपाहारगृहांच्या झाडाझडतीने होणार नववर्षाचे स्वागत

कमला मिल आगीची आठवण : उपाहारगृहांच्या झाडाझडतीने होणार नववर्षाचे स्वागत

Next

मुंबई : नववर्षाच्या स्वागताचे काउंटडाउन सुरू असताना, आगीच्या सत्राने मुंबईकरांच्या मनात पुन्हा एकदा धडकी भरली आहे. रविवारी दिवसभरात पाच ठिकाणी छोट्या-मोठ्या आगीच्या घटना घडल्या. या घटनांनी मात्र कमला मिल कम्पाउंडच्या दुर्घटनेच्या जखमा ताज्या केल्या आहेत. यामुळे मुंबई अग्निशमन दल सतर्क झाले असून, पुढील आठवडाभर सर्व रेस्टॉरंटची तपासणी करून, सुरक्षेची खात्री करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी लोअर परळ येथील वन अबव्ह आणि मोजो बिस्ट्रोमध्ये आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील सर्व उपाहारगृहांची तपासणी केली, तसेच सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या उपाहारगृहांना तत्काळ टाळे लावण्यात आले. त्यानंतर, उपाहारगृहांमध्ये जागरूकता निर्माण होऊन खबरदारीचे उपाय करण्यात आले.
मात्र, या वर्षी पुन्हा डिसेंबर महिन्यात आगीचे सत्र सुरू झाले आहे. अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत ११ रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेनंतरही आगीचे सत्र सुरूच आहे. याची गंभीर दखल घेऊन रेस्टॉरंट, गच्चीवरील उपाहारगृह अशा सर्वांची ३१ डिसेंबरपर्यंत चाचपणी होणार आहे. अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित असणे, अग्निसुरक्षेचे सर्व नियम पाळले असल्याची खातरजमा या पाहणीतून करण्यात येणार आहे, तर नियम मोडणारी उपाहारगृहे बंद करण्यात येणार आहेत.

आपत्ती काळात बाहेर पडण्याच्या मार्गाची पाहणी

या तपासणीत उपाहारगृहांकडे सर्व परवानगी आहेत का? अन्न शिजविण्यासाठी वापरलेले सिलिंडर, अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित असणे, प्रवेश आणि आपत्ती काळात बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याची पाहणी केली जाणार आहे.

बहुतांशी आगीच्या घटनांत इमारत अथवा रेस्टॉरंटबाहेर पडणाºया मार्गात अडथळा आढळतो; तसेच अग्निरोधक यंत्रणाही निकामी असते. मात्र, पाहणीत असे आढळल्यास संबंधित उपाहारगृहावर कारवाई करण्यात येणार आहे.
सर्वाधिक व्यावसायिक कंपन्या व उद्योगांचे हब असलेल्या लोअर परळ, वरळी भागातील अडीचशे उपाहारगृहांच्या तपासणीसाठी आरोग्य, अग्निशमन आणि इमारत विभागातील अधिकाºयांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे.

Web Title: Remembrance of Kamala Mill fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.