मुंबई : राज्यातील पाच कोटी मराठा समाजाच्या आरक्षणासह २१ प्रमुख मागण्यांवर तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करत मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाने सरकारला आचारसंहितेचा अल्टीमेटम दिला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बुधवारी झालेल्या बैठकीत सरकारविरोधी ठराव मांडला. मागण्यांची अंमलबजावणी आचारसंहितेपूर्वी न झाल्यास राज्यभर पाच लाख फलक लावून सरकारविरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याचे समन्वयक महेश डोंगरे यांनी सांगितले.
‘मराठा समाजाच्या उर्वरित मागण्या आचारसंहितेपूर्वी मार्गी लावा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 04:51 IST