रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खेरवाडी राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 10:08 IST2024-01-22T10:07:05+5:302024-01-22T10:08:52+5:30

खेरवाडी चौक येथे पालिका केंद्राजवळ जुने राम मंदिर आहे.

Religious program at kherwadi ram temple in bandra mumbai | रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खेरवाडी राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम

रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खेरवाडी राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मुंबई : अयोध्या येथील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वांद्रे येथील प्रसिद्ध राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खेरवाडी चौक येथे पालिका केंद्राजवळ जुने राम मंदिर आहे. या राम मंदिरात दरवर्षी रामनवमी जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे हे मंदिर सर्वत्र प्रसिद्ध आहे. 

 अयोध्या येथील रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खेरवाडी राम मंदिर व्यवस्थापन मंडळ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी मंदिरात पूजा, अखंड सुंदरकांड वाचन, मिरवणूक असे कार्यक्रम होणार आहेत.

Web Title: Religious program at kherwadi ram temple in bandra mumbai

टॅग्स :Mumbaiमुंबई