Join us  

पालिका घेणार धार्मिक स्थळे, शाळा सुरू करण्यापूर्वी आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 8:06 AM

राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा आणि ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा आणि ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : शाळांपाठोपाठ आता धार्मिक स्थळांचे द्वारही उघडण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने महापालिका यंत्रणा सतर्क आहे. तत्पूर्वी रोजची रुग्णवाढ, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी यांचा आढावा पालिका प्रशासन घेत आहे. 

राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा आणि ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर चित्रपटगृह, मॉलही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.

मंगळवारी नियमावलीशाळा आणि धार्मिक स्थळे सुरू करताना कोणती काळजी घ्यावी?, नियमांचे कसे पालन करावे? याबाबत नियमावली तयार करण्यात येणार आहे. ती मंगळवारपर्यंत पालिका प्रशासन जाहीर करण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतर १५ दिवसांच्या कालावधीत कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे का? याचा आढावा घेण्यात येत आहे. हा कालावधी ५ ऑक्टोबरला संपेल, तोपर्यंत मुंबईतील चित्र स्पष्ट होईल.सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकाशाळामंदिर