Join us  

अंबानींकडून 'गिगा' धमाका; रिलायन्स देणार सर्वात स्वस्त ब्रॉडबँड 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 12:31 PM

ब्रॉडब्रँड क्षेत्रात रिलायन्स जिओची एन्ट्री

मुंबई: मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्सनं आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. याबद्दलची घोषणा रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. रिलायन्सकडून जिओ गिगा टीव्ही सुरू करण्यात येणार आहे. यामुळे भारतीयांची टीव्ही पाहण्याची पद्धत बदलेल, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला. जिओ गिगा टीव्ही व्हाईस कमांड आणि रिमोटनं चालेल. यासोबतच जिओ गिगा टीव्हीमध्ये कॉलिंगची सुविधादेखील उपलब्ध असेल. यामुळे एका जिओ गिगा टीव्हीवरुन दुसऱ्या जिओ टीव्हीवर फोन लावता येईल. याशिवाय जिओ गिगा टीव्हीवरुन मोबाईलवरही कॉल करता येईल. या टीव्हीला व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट लावल्यास 360 अंशातील व्ह्यू पाहता येईल. जिओ गिगा टीव्हीसोबतच मुकेश अंबानी यांनी जिओ गिगा फायबरचीही घोषणा केली. या घोषणेसोबतच रिलायन्स समूहानं ब्रॉडबँड क्षेत्रात प्रवेश केला आहे. जिओची ब्रॉडब्रँड सेवा सर्वात स्वस्त असेल, असं अंबानी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्राप्रमाणेच ब्रॉडब्रँड क्षेत्रातही आता रिलायन्स जिओ आणि इतर कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिओ गिगा राऊटर, गिगा टीव्ही सेटटॉप बॉक्स आणि गिगा टीव्ही कॉलिंग सेवेचेही घोषणा करण्यात आली आहे.  

टॅग्स :रिलायन्स जिओरिलायन्स कम्युनिकेशनरिलायन्समुकेश अंबानी