व्यापारी जहाजावर अडकलेल्या रुग्णाची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:07 IST2021-01-22T04:07:47+5:302021-01-22T04:07:47+5:30

व्यापारी जहाजावर अडकलेल्या रुग्णाची सुटका नौदलाची कामगिरी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारतीय नौदलाने गुरुवारी वैद्यकीय साहाय्यता मोहीम हाती ...

Release of a patient stranded on a merchant ship | व्यापारी जहाजावर अडकलेल्या रुग्णाची सुटका

व्यापारी जहाजावर अडकलेल्या रुग्णाची सुटका

व्यापारी जहाजावर अडकलेल्या रुग्णाची सुटका

नौदलाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय नौदलाने गुरुवारी वैद्यकीय साहाय्यता मोहीम हाती घेत व्यापारी जहाजावरील रुग्णाची सुखरूप सुटका केली.

मुंबईच्या समुद्रापासून १८ सागरी मैलांवर ईव्ही इगल तम्पा या व्यापारी जहाजावर गीता सेल्वराजा या ३४ वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. व्यापारी जहाजाच्या प्रतिनिधींनी सदर महिलेला दुसऱ्या बोटीने मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, समुद्रातील उंच लाटांमुळे रुग्णाला बोटीवर हलविणे अशक्य झाले. दोन वेळा याबाबतचा प्रयत्न फसला. त्यातच महिला बेशुद्ध झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. अखेर नौदलाच्या हेलिकाॅप्टरने वैद्यकीय साहाय्यता मोहीम हाती घेत या रुग्णाला सुखरूपपणे मुंबईतील आय.एन.एस. शिक्रा तळावर आणले. तेथून रुग्णवाहिकेतून रुग्णाला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.

Web Title: Release of a patient stranded on a merchant ship