लिव्ह अॅण्ड लायसन्सची नोंदणी जुलैपर्यंत बंद, स्टॅम्प ड्युटी कार्यालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 23:50 IST2020-04-25T23:50:39+5:302020-04-25T23:50:55+5:30
फिजिकल रजिस्ट्रेशनजरी बंद करण्यत आले असले तरी ई रजिस्ट्रेशनचा पर्याय मात्र देण्यात आला आहे.

लिव्ह अॅण्ड लायसन्सची नोंदणी जुलैपर्यंत बंद, स्टॅम्प ड्युटी कार्यालयाचा निर्णय
मुंबई : लिव्ह अॅण्ड लायसन्सचे फिजिकल रजिस्ट्रेशन येत्या जुलैपर्यंत थांबवण्यात आले आहे. स्टॅम्प ड्युटी कार्यालयामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. फिजिकल रजिस्ट्रेशनजरी बंद करण्यत आले असले तरी ई रजिस्ट्रेशनचा पर्याय मात्र देण्यात आला आहे.
कोरोनाविरोधातील लढ्यात लोकांची गर्दी टाळण्यासाठी लिव्ह अॅण्ड लायसन्सचे फिजिकल रजिस्ट्रेशनला जुलैपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टॅम्प ड्युटी कार्यालयाने याबाबतचे स्पष्टीकरण देणारे एक परिपत्रक काढले आहे. इन्स्पेक्टर जनरल आॅफ महाराष्ट्रमार्फत (रजिस्ट्रेशन अॅण्ड स्टॅम्प) हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र आॅनलाईनचा पर्याय उपलब्ध ठेवला आहे.
लिव्ह अॅण्ड लायसन्सची फिजिकल नोंदणी बंद असताना नोटीस आॅफ इंटिमेशनदेखील जुलै २०२० अखेरीपर्यंत थांबवण्यात आले आहे. यासाठीही आॅनलाईनचा पर्याय देण्यात आला आहे. येत्या जूनपर्यंत अतिशय महत्वाच्या नसणाऱ्या कागदपत्रांची नोंदणी देखील थांबवली आहे.
मार्च महिन्यात १२ हजार ९०७ लिव्ह अॅण्ड लायसन्सची कागदपत्रे नोंदविण्यात आली. त्यासाठी ई रजिस्ट्रेशनचा वापर करण्यात आला. २ हजार ८३५ इतक्या प्रमाणात लिव्ह अॅण्ड लायसन्स फिजिकल रजिस्ट्रेशन पद्धतीने नोंदविण्यात आली. त्यामधून ४.४३ कोटी रूपयांचा महसूल शासनाला मिळाला. तर ई रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून १.९१ कोटी रूपयांचा महसूल मिळाला. तर एप्रिल महिन्यात फक्त २१ लिव्ह अॅण्ड लायसन्स करार नोंदविण्यात आले. त्यामधून ३९ हजार ६१७ रूपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे.