Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हाडा’च्या ११८ घरांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी; प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर सदनिकांची विक्री करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 06:39 IST

सदनिकेची निश्चिती केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने सदनिकेच्या विक्री किमतीच्या १० टक्के रक्कम ४८ तासांच्या आत भरावी लागेल. या कालावधीत रकमेचा भरणा न केल्यास सदनिकेवरचा दावा रद्द होईल. अनामत रक्कम मंडळाकडे जमा करण्यात येईल.

मुंबई : ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील ११८ सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विकल्या जाणार आहेत. यासाठी ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ पासून सुरू होणार आहे. यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा यात समावेश आहे.

लग्नापूर्वी संबंध ठेवताना सावधान! विश्वास ठेवू नका; सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध सदनिकांसाठी अर्जदारांनी अर्ज करण्याकरिता संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना/सदनिका निश्चिती करणे या प्रक्रियेला ४ मार्च रोजी सकाळी ११ पासून सुरुवात होणार आहे. सदनिकेच्या विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा सदनिका निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत अर्जदाराने करणे आवश्यक आहे.   

सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी/ सल्ला देणारा वा प्रॉपर्टी एजंट म्हणून नियुक्त केलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, असे ‘म्हाडा’ने म्हटले आहे.

सदनिकेची निश्चिती केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने सदनिकेच्या विक्री किमतीच्या १० टक्के रक्कम ४८ तासांच्या आत भरावी लागेल. या कालावधीत रकमेचा भरणा न केल्यास सदनिकेवरचा दावा रद्द होईल. अनामत रक्कम मंडळाकडे जमा करण्यात येईल.

कुठे किती घरे

शिंपोली कांदिवली       ८

चारकोप सेक्टर-८ कांदिवली       १

अँटॉप हिल-वडाळा       २७

तुंगा पवई येथील        ४२

पीएमजीपी मानखुर्द             १

मालवणी मालाड १

गायकवाडनगर मालवणी-मालाड    १

विकास नियंत्रण नियमावली ३३(५) (७) ५८ अंतर्गत मंडळाला प्राप्त सदनिका

घाटकोपर पूर्व    २

कन्नमवारनगर विक्रोळी   १

अँटॉप हिल-वडाळा       ८

भायखळा       ६

ताडदेव         ६

लोअर परळ     ४

सायन २

जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम ७

English
हिंदी सारांश
Web Title : MHADA to Sell 118 Homes on First-Come, First-Served Basis

Web Summary : MHADA Mumbai is selling 118 homes on a first-come, first-served basis. Registration starts February 17th. These units, previously unsold, require online registration, deposit payment, and application fee. Successful applicants must pay 10% of the price within 48 hours to secure the flat.
टॅग्स :म्हाडा लॉटरी