Join us  

गूगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी १ लाख १८ हजार शिक्षकांची नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 2:32 AM

पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण घेतलेले शिक्षक नंतर अन्य शिक्षकांना शिकवतील. असे करून सात लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे.

मुंबई : ‘गूगल क्लासरूम’च्या वतीने राज्यभरातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून १३ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत १,१८,४४४ इच्छुक शिक्षकांची नोंदणी झाली आहे. प्राथमिकपासून बारावीपर्यंतच्या शिक्षकांचा यात समावेश आहे. राज्यात या गटात जवळपास सात लाख शिक्षक आहेत. नोंदणी झालेल्यांपैकी पहिल्या टप्प्यात ४० हजार शिक्षकांचे प्रशिक्षण केले जाणार आहे.पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण घेतलेले शिक्षक नंतर अन्य शिक्षकांना शिकवतील. असे करून सात लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे. आज जिल्हानिहाय किती शिक्षकांनी नावे नोंदवली त्याचे आकडे येथे दिले आहेत, त्यात अहमदनगर ३५९६, अकोला ३१४१, अमरावती २६६३, औरंगाबाद ४२५२, भंडारा ११०७, बीड ३०८९, बुलडाणा ४५२३, चंद्रपूर २९२५, धुळे २६२२, गडचिरोली १६४६, गोंदिया १४०१, हिंगोली १७३८, जळगाव ४२४६, जालना १८०९, कोल्हापूर २८०१, लातूर ३६४८, मुंबई उपनगर ४४८१, मुंबई ४११७, नागपूर ४३७२, नांदेड २२१७, नंदुरबार १४६६, नाशिक ६३५२, उस्मानाबाद २५९१, पालघर ३२९८, परभणी २३६६, पुणे ८२५२, रायगड २६९३, रत्नागिरी १७१६, सांगली ३८६०, सातारा ७६८६, सिंधुदुर्ग १०१४, सोलापूर ३७४८, ठाणे ८७७६, वर्धा १४०४, वाशीम १०२४, यवतमाळ २१०३ एवढ्या शिक्षकांनी नोंदणी केली आहे. हा उत्साह पाहून शिक्षण विभागदेखील हरखून गेला आहे.गूगल क्लासरूम म्हणजे वर्गाचीच ई-प्रतिकृती असते. या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी आणि पासवर्ड शासनातर्फे दिला जाईल. त्यामुळे विशिष्ट शाळेतल्या विशिष्ट वर्गातल्या विद्यार्थ्यांनाच गूगल क्लासरूममध्ये शिकता येईल. या ठिकाणी गृहपाठ, वर्गपाठ, मूल्यांकनदेखील आॅनलाइन करण्याची सुविधा आहे. विद्यार्थ्यांना घरी देण्यात आलेला अभ्यासक्रम तपासण्याची सुविधाही या ठिकाणी आहे.

टॅग्स :शिक्षणगुगल