ऑनलाईन प्रशिक्षणातून रेल्वे कर्मचाऱ्यांना केलं रिफ्रेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 21:59 IST2020-06-25T21:58:05+5:302020-06-25T21:59:05+5:30
मध्य रेल्वेने एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रशिक्षणात कुर्ला, कळवा आणि सानपाडा कार शेडमधील ५९ कर्मचारी सहभागी झाले होते.

ऑनलाईन प्रशिक्षणातून रेल्वे कर्मचाऱ्यांना केलं रिफ्रेश
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे आपले कर्तव्य पार पाडत आहे. मध्य रेल्वे लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी माल गाडी आणि पार्सल रेल्वे गाड्या सुरु आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार मध्य रेल्वेकडून अत्यावश्यक कर्मचार्यांसाठी २०० उपनगरी लोकल सेवा चालवित येत आहे. या लोकल गाड्यांच्या नियमित देखभालीचे मध्य रेल्वेच्या कुर्ला, कळवा आणि सानपाडा ईएमयू कारशेड्स सुरु आहे. त्यामुळे कुर्ला, कळवा आणि सानपाडा ईएमयू कारशेड्स मध्य रेल्वेच्या लोकल गाड्याची देखभाल करण्यात येत आहे तर ऑनलाईन प्रशिक्षणातून कामगारांना रिफ्रेश केले जात आहे.
मध्य रेल्वेने एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रशिक्षणात कुर्ला, कळवा आणि सानपाडा कार शेडमधील ५९ कर्मचारी सहभागी झाले होते. मे आणि जून मध्ये कुर्ला, कळवा आणि सानपाडा या तिन्ही कारशेडमधील २६२ कर्मचारी ईएमयू आढावा घेण्यासाठीच्या ऑनलाइन प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. तसेच रेल्वेच्या कारागीर कर्मचा-यांसाठी एका आठवड्याच्या कालावधीचे ऑनलाईन रीफ्रेशर कोर्स प्रशिक्षण बॅचेसमध्ये घेण्यात आले. ज्यामध्ये पहिल्या बॅचमध्ये ७३ आणि दुसर्या बॅचमध्ये ५३ अशा १२६ कर्मचाऱ्यांना ऑनलाईन रिफ्रेशर कोर्स प्रशिक्षण दिले जाते.
नियमित अंतराने स्थिर रॅकच्या बॅटरी व्होल्टेज तपासणीसह सुरक्षा आणि संरक्षाची तपासणी केली जाते. १००-५०० मीटर अंतराच्या मुव्हमेंट द्वारे अंडर-गियरचे परीक्षण केले जाते. दिवे, पंखे, स्विचेस, पीए / पीआयएस (पब्लिक अड्रेस/ इन्फर्मेशन सिस्टीम) यासारख्या प्रवाशांच्या सुविधांची तपासणी आणि लक्ष पुरविले जाते. विविध स्टॅबलिंग साइडिंगवर स्थिर सर्व रॅक्सच्या खिडक्या आणि दारे बंद करण्याबरोबर सीलिंग केली जाते; सर्व पंटोग्राफ खाली ठेवले जाते ; बॅटरी स्विच विलग करण्यात येतो. स्किडसह सुरक्षित केलेले सुरक्षेच्या उद्देशाने आरपीएफकडे दिले जाते. कारशेडच्या रेल्वे कामगारांना मध्य रेल्वेकडून ऑनलाईन प्रशिक्षण सुद्धा देण्यात येत आहे.