Join us

फडणवीस, राज ठाकरेंसह काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात; आता सुरक्षेवरून राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 06:39 IST

आशिष शेलार यांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांनाही वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या सुरक्षाव्यवस्थेतही कपात करण्यात आली आहे

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांची सुरक्षाव्यवस्था कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला असला तरी सुरक्षा कपातीवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

आशिष शेलार यांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांनाही वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या सुरक्षाव्यवस्थेतही कपात करण्यात आली आहे. त्यांची झेड सुरक्षाव्यवस्था कमी करत वाय प्लस एक्स्कॉर्टसह सुरक्षाव्यवस्था देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय त्यांची बुलेट-प्रूफ गाडी काढून घेण्यात आली आहे. यावरुन आता चांगलंच राजकारण रंगलं आहे. 

टॅग्स :मनसेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरे