Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास गरजेचा, नवा प्रस्ताव द्या; गृहराज्यमंत्री कदम यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:51 IST

नव्या कारागृह निर्मितीसाठी २२ एकर जागेची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज असून, या कारागृहाच्या पुनर्विकासाच्या सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत. या सुधारित आराखड्यात कर्मचारी निवास, पुरुष, महिला, तृतीयपंथी कैदी, न्यायाधीन कैदी यांच्यासाठी स्वतंत्र कोठडीचा समावेश असावा. बहुमजली, पर्यावरणपूरक, जास्तीत जास्त ग्रीन एनर्जीचा उपयोग असणाऱ्या कारागृह निर्मितीसाठी महापालिकेला वाढीव चटई निर्देशांकबाबत नियमात शिथिलतेचा प्रस्ताव द्यावा. वाढीव चटई निर्देशांक मिळाल्यानंतर पुनर्विकासाचा सुधारित आराखडा सादर करावा, असे निर्देश राज्यमंत्री कदम यांनी दिले आहेत.

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाबाबत मंत्रालयात गुरुवारी आयोजित बैठकीत राज्यमंत्री कदम बोलत होते. बैठकीस गृह विभागाचे प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या पोलिस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, सहसचिव धपाटे, नगर विकास व कारागृह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

नव्या कारागृह निर्मितीसाठी २२ एकर जागेची पाहणी

  • बहुमजली कारागृहाचा प्रस्ताव सादर करताना जगातील अशा पद्धतीने असलेल्या कारागृहांचा अभ्यास करण्यात यावा. सुरक्षेच्यादृष्टीने काटेकर उपाययोजनांचा समावेश आराखड्यात असावा. 

  • आर्थर रोड कारागृहाप्रमाणेच भायखळा येथील कारागृहाच्या पुनर्विकासाबाबतही आराखडा तयार करावा. नवीन कारागृह निर्मितीसाठी मानखुर्द येथील २२ एकर जागेची पाहणी करण्यात यावी. 

  • भविष्यात नवीन कारागृह निर्मिती करताना अडचण येऊ नये, यासाठी या जागेवर आरक्षण टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्यात.

टॅग्स :योगेश कदमआर्थररोड कारागृह