मुंबईमध्ये ६,१९८ कोटींचा विक्रमी मालमत्ता कर जमा, एकूण उद्दिष्टाच्या ९९.९७ % महसूल; अतिरिक्त दंडातून १७८ कोटी वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:56 IST2025-04-02T12:56:21+5:302025-04-02T12:56:36+5:30

Property Tax Collection Mumbai: महापालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सहा हजार १९८ कोटी पाच लाख रुपये एवढा विक्रमी मालमत्ता कर जमा करण्यात यश आले आहे. महापालिकेच्या एकूण उद्दिष्टाच्या ९९.९७ टक्के कर संकलन झाले आहे. याआधी २०२१-२२ मध्ये ५,७९१.६८ कोटी सर्वाधिक मालमत्ता कर संकलित झाला होता. 

Record property tax collection of Rs 6,198 crore in Mumbai, | मुंबईमध्ये ६,१९८ कोटींचा विक्रमी मालमत्ता कर जमा, एकूण उद्दिष्टाच्या ९९.९७ % महसूल; अतिरिक्त दंडातून १७८ कोटी वसूल

मुंबईमध्ये ६,१९८ कोटींचा विक्रमी मालमत्ता कर जमा, एकूण उद्दिष्टाच्या ९९.९७ % महसूल; अतिरिक्त दंडातून १७८ कोटी वसूल

 मुंबई -  महापालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सहा हजार १९८ कोटी पाच लाख रुपये एवढा विक्रमी मालमत्ता कर जमा करण्यात यश आले आहे. महापालिकेच्या एकूण उद्दिष्टाच्या ९९.९७ टक्के कर संकलन झाले आहे. याआधी २०२१-२२ मध्ये ५,७९१.६८ कोटी सर्वाधिक मालमत्ता कर संकलित झाला होता.

महापालिकेकडून यंदा अतिरिक्त दंडाच्या स्वरूपात २ टक्के प्रमाणे अधिकचे १७८ कोटी ३९ लाख रुपयेदेखील संकलित करण्यात आले आहेत. मालमत्ता कर विभागाकडून कर संकलनासाठी वर्षाच्या सुरुवातीपासून प्रयत्न करण्यात आले. नागरिकांनी वेळेवर करभरणा करण्यासाठी जनजागृती करणे, साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवणे, ऑनलाइन सुविधा, मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करणे तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा करणे, आदींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.

Web Title: Record property tax collection of Rs 6,198 crore in Mumbai,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.