जुन्या इमारतींची पुनर्बांधणी, झोपडपट्टी पुनर्वसन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:06 IST2026-03-15T14:06:42+5:302026-03-15T14:06:42+5:30
दादर पूर्वेकडील स्वामीनारायण मंदिरपासून, कोहिनूर मिल, सहकारनगर, शिवडीचा आर. ए. किडवाई मार्ग, वडाळा येथील भरतनगर, कात्रक रोड झोपडपट्टी, फाइव्ह गार्डन, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी परिसर या प्रभागात आहे. झोपडपट्टी भागात गलिच्छ वस्ती सुधार योजना राबविली जात नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

जुन्या इमारतींची पुनर्बांधणी, झोपडपट्टी पुनर्वसन
सुजित महामुलकर -
मुंबई : मध्य मुंबईतील उच्चभ्रू वस्ती, मध्यमवर्ग आणि झोपडपट्टी, असा संमिश्र प्रभाग क्रमांक १७८ विरळाच म्हणावा लागेल. या प्रभागाचे नेतृत्व शिंदेसेनेचे नगरसेवक आणि गटनेते अमेय घोले करत आहेत. मोकळ्या जागा या प्रभागात मोठ्या प्रमाणावर असल्या तरी जुन्या इमारतींची पुनर्बांधणी, झोपडपट्टी पुनर्वसन, खडबडीत रस्ते, या समस्या सोडविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
दादर पूर्वेकडील स्वामीनारायण मंदिरपासून, कोहिनूर मिल, सहकारनगर, शिवडीचा आर. ए. किडवाई मार्ग, वडाळा येथील भरतनगर, कात्रक रोड झोपडपट्टी, फाइव्ह गार्डन, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी परिसर या प्रभागात आहे. झोपडपट्टी भागात गलिच्छ वस्ती सुधार योजना राबविली जात नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
पारसी कॉलनी आणि हिंदू कॉलनीमध्ये ‘एफ नॉर्थ सिटीझन फेडरेशन’ ही जागरूक नागरिकांची संघटना येथे कार्यरत असून, पालिकेच्या प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे येथील मोकळ्या जागा अतिक्रमणांपासून मुक्त राहिल्या आहेत. दुसरीकडे वडाळा येथील कात्रक रस्त्याची अवस्था बिकट असून मोनोरेलच्या खालून जाणारा काँक्रीट रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय आहे.