Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळाची गरज ओळखून वैद्यकीय संशोधन विभाग पुनर्जीवित करावा; माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 18:56 IST

माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : महाराष्ट्रात एन.आय.व्ही.च्या रूपाने व्हायरॉलॉजी लॅब कार्यरत असून ती उत्तम कार्य करत आहे. कोरोना व्हायरस हा सतत म्युटेट होत आहे.आतापर्यंत 27 हुन अधिक वेळा तो म्युटेट झाला आहे. बी.1.1.7 हा व्हेरीअंट व्हायरस हा सध्या ब्रिटन व इतर युरोपियन देशात धुमाकूळ घालत असतांना पुन्हा दक्षिण आफ्रिकेत या व्हायरसचा वेगळा प्रकार सापडत आहे.यावर सतत अभ्यास विदेशी देशात होत आहे.

आपल्याकडे देखिल रिसर्च विभाग आहे. त्याला खऱ्याअर्थाने पुनर्जीवित करून रिसर्चचे काम व्हायरॉलॉजी आणि बँक्टरॉलॉजीमध्ये सुरू व्हावे अशी आग्रही मागणी राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.विलेपार्ले पश्चिम येथील कूपर हॉस्पिटलच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयात कॅथलॅब प्रपोज असूनही अजून सुरू झालेली नाही. यासाठी आपण थोडा पुढाकार घेतला तर गरीब रुग्णांना अँजिओग्राफी-प्लॅस्टि साठी केईएम रुग्णालयात जावे लागणार नाही.तसेच केईएम येथील हृदयक्रिया प्रलंबित राहणार नाही.

पश्चिम उपनगरात ही सुविधा सुरू केल्यास अनेक हृदयरोगतज्ञ ही सेवा नाममात्र शुल्कावर देण्यास तयार होऊ शकतात. कारण कूपर रुग्णालयात सर्व सेटअप तयार असून ही सुविधा सुरू करण्यासाठी आपण थोडा प्रयत्न करावा अशी विनंती सुद्धा पत्राद्वारे डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र