मुंबई - मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी उपनगरी मार्गांवर रविवार मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी १५:४५ वाजेपर्यंत ब्लॉक आहे. तर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान ११:१० ते १६:१० पर्यंत अप आणि डाउन हार्बर मार्गावर ब्लॉक आहे.
सीएसएमटी येथून सकाळी १०:३६ ते दुपारी ३:१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकातून धिम्या मार्गावर वळविल्या जातील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील. तर मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविल्या जातील. ठाणे येथून सकाळी ११:०३ ते दुपारी ३:३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद गाड्या मुलुंड स्थानक येथून अप धिम्या मार्गावर वळविल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबतील. या गाड्या माटुंगा स्थानकावर जलद मार्गावर पुन्हा वळविल्या जातील.
सीएसएमटी येथून सकाळी १०:३४ ते सायंकाळी ४:३६ पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी १०:१७ ते सायंकाळी ४:४७ पर्यंत मुंबईला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द केल्या आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांवर विशेष गाड्या चालविल्या जातील. ब्लॉक काळात प्रवाशांना ठाणे - वाशी / नेरूळदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
कांजूरमध्ये ब्लॉक; ठाणे लोकल रद्द
मध्य रेल्वेवर कांजूरमार्ग रेल्वे स्थानक पादचारी उड्डाणपुलासाठी ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर, रोड क्रेनच्या साहाय्याने लाँच करण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १:०५ पासून ते सकाळी ४:३५ वाजेपर्यंत विक्रोळी ते मुलुंडदरम्यान ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी-ठाणे ही १५ फेब्रुवारी रोजी सीएसएमटी येथून १२:२४ वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. ठाणे-सीएसएमटी ही लोकल ठाणे येथून पहाटे ४:०४ वाजता सुटणारी गाडी रद्द आहे, तर सीएसएमटी-कर्जत रेल्वे स्थानक ही लोकल १५ फेब्रुवारी रोजी सीएसएमटी येथून १२:१२ वाजता सुटणारी गाडी माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहे.
Web Summary : Central Railway will have a mega block on Sunday for maintenance. Services will be affected on the Matunga-Mulund fast line and the Kurla-Vashi Harbour line. Some local trains will be cancelled or diverted. Plan journeys accordingly.
Web Summary : मध्य रेलवे पर रखरखाव के लिए रविवार को मेगा ब्लॉक रहेगा। माटुंगा-मुलुंड फास्ट लाइन और कुर्ला-वाशी हार्बर लाइन पर सेवाएं प्रभावित रहेंगी। कुछ लोकल ट्रेनें रद्द या परिवर्तित की जाएंगी। अपनी यात्रा की योजना उसी अनुसार बनाएं।