RBI Governor Das underlines signs of slowdown | आरबीआय गव्हर्नर दास यांनी अधोरेखित केले मंदीचे संकेत
आरबीआय गव्हर्नर दास यांनी अधोरेखित केले मंदीचे संकेत

मुंबई : अलीकडेच झालेल्या पतधोरण आढावा समितीच्या (एमपीसी) बैठकीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीचे अनेक संकेत अधोरेखित करून रेपोदरात ३५ आधार अंकांचा आग्रह धरला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
या बैठकीच्या इतिवृत्तातून ही माहिती मिळते. एमपीसीच्या सहा सदस्यांपैकी चार सदस्यांनी ३५ आधार अंकांच्या कपातीचा आग्रह धरला होता. विशेष म्हणजे बँकेने अंतर्गत सदस्य वाढीव दरकपातीसाठी आग्रही असल्याचे बैठकीत प्रथमच दिसले.
मोठ्या दरकपातीची कारणे देताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अर्थव्यवस्थेत मंदीचा शिरकाव होत असल्याचे संकेत अधोरेखित केले. त्यांनी म्हटले की, ग्रामीण भागातील मागणी सातत्याने घटत आहे. विशेषत: ट्रॅक्टर आणि मोटारसायकलींची विक्री घटली आहे. शहरी भागात प्रवासी वाहनांची विक्री जूनमध्ये घटली. देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतूक क्षेत्रात तीन महिन्यांनंतर सकारात्मक वृद्धी
दिसून आली आहे. बांधकाम क्षेत्रात सिमेंट उत्पादन आणि पोलाद वापर घटला आहे. अशा परिस्थितीत २५ आधार अंकांची कपात अपुरी ठरेल.


Web Title:  RBI Governor Das underlines signs of slowdown
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.