Join us

राज्यमंत्र्यांचे शिवरायांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटो सेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 01:37 IST

उल्हासनगरमध्ये भाजपच्या उमेदवार पंचम कलानी यांची महापौरपदी निवड करण्यात आली.

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भाजपच्या उमेदवार पंचम कलानी यांची महापौरपदी निवड करण्यात आली. यावेळी उत्साहामध्ये राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर फोटो काढताना थेट शिवरायांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटोसेशन केल्याने शिवप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

रविंद्र चव्हाण हे भाजपच्या सरकारमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण आणि इतर खात्यांचे राज्यमंत्री आहेत. उल्हासनगरमध्ये आज पप्पू कलानी गटाच्या उमेदवार पंचम कलानी यांची महापौरपदी निवड झाली. या निवडीनंतर कलानी आणि रविंद्र चव्हाण हे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले होते. यावेळी पुतळ्याला हार घातल्यानंतर चव्हाण यांनी एखाद्या कार्यक्रमामध्ये ग्रुप फोटो सेशन केल्यासारखे शेजारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवला. 

हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

टॅग्स :उल्हासनगरछत्रपती शिवाजी महाराजराज्य सरकार