रत्नाकर मतकरी यांना ‘चतुरंग’ जीवनगौरव !
By Admin | Updated: August 25, 2014 01:19 IST2014-08-25T01:19:50+5:302014-08-25T01:19:50+5:30
चतुरंग प्रतिष्ठान’च्या २४व्या जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नाटककार, बालरंगभूमी तसेच प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीसाठी कार्यरत असणाऱ्या लेखक-दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांची निवड करण्यात आली आहे.

रत्नाकर मतकरी यांना ‘चतुरंग’ जीवनगौरव !
मुंबई : ‘चतुरंग प्रतिष्ठान’च्या २४व्या जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नाटककार, बालरंगभूमी तसेच प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीसाठी कार्यरत असणाऱ्या लेखक-दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांची निवड करण्यात आली आहे. यंदाचा पुरस्कार सांस्कृतिक क्षेत्रासाठी दिला जात असून, १ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डिसेंबरमध्ये होणाऱ्या चतुरंग रंगसंमेलनात हा पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना प्रदान करणार आहे. अव्वल नाट्यगुणांच्या प्रतिभेने रंगभूमीवर मौल्यवान भर घातल्याबद्दल, या पुरस्काराने व्यक्त होत असल्याची भावना चतुरंग प्रतिष्ठानने व पुरस्कार निवड समितीने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)