रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 19:10 IST2020-07-25T19:09:10+5:302020-07-25T19:10:19+5:30
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे.

रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण
मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी उध्दव ठाकरेंचा लहान मुलगा तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. अवघ्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानातील तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी मातोश्री निवासस्थानाच्या बंदोबस्तावरील पोलिसांना कोरोना झाला होता. ठाकरे कुटुंबियांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी सातत्याने कोरोनाचा संसर्ग होत असल्याने काळजी व्यक्त केली जात आहे.