Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायन रुग्णालयात रुग्णाच्या बहिणीवर बलात्कार; वॉर्डबॉय असल्याचे भासवून केले कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 03:37 IST

सायन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिला रुग्णाच्या बहिणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायन पोलिसांनी दीपक कुंचीकुर्वे (३१) याला धारावीतून अटक केली आहे.

मुंबई : सायन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिला रुग्णाच्या बहिणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायन पोलिसांनी दीपक कुंचीकुर्वे (३१) याला धारावीतून अटक केली आहे. वॉर्डबॉय असल्याचे भासवून पीडितेला गच्चीवर नेले आणि मारहाण करीत त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.तक्रारदार ३७ वर्षीय विवाहिता पुण्याची रहिवासी आहे. तिची बहीण सायन रुग्णालयात मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेत आहे. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास बहिणीचे वैद्यकीय बिल कमी करण्यासाठी अर्ज कुठे मिळतो? याबाबत ती विचारणा करत होती. त्याचदरम्यान दीपकची तिच्यावर नजर पडली. त्याने वॉर्डबॉय असल्याचे सांगून तिला गच्चीवर नेले. त्याने जबरदस्ती करताच तिने प्रतिकार केला. मात्र मारहाण करीत त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि पळ काढला.विवाहितेने स्वत:ला कसेबसे सावरत तेथील सुरक्षारक्षकाला याबाबत सांगितले. त्यांनी तत्काळ सीसीटीव्हीच्या मदतीने शोध सुरू केला. तोपर्यंत आरोपी पसार झाला होता. पीडितेने सायंकाळी सायन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. शनिवारी दीपक कुंचीकुर्वे याला बेड्या ठोकण्यात आल्या.आरोपी धारावीचा रहिवासी आहे. तो परिसरात सफाई कामगार म्हणून काम करतो. त्यानेदारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी सायन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :बलात्कारगुन्हेगारी