गुंगीचे औषध देऊन बलात्कार, गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 26, 2016 01:59 IST2016-09-26T01:59:34+5:302016-09-26T01:59:34+5:30
एका महिलेला जेवणातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करून अश्लिल चित्रीकरण केले. त्यानंतर ब्लॅकमेल करून दहा हजार रुपयांची खंडणीही घेतली.

गुंगीचे औषध देऊन बलात्कार, गुन्हा दाखल
विरार : एका महिलेला जेवणातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करून अश्लिल चित्रीकरण केले. त्यानंतर ब्लॅकमेल करून दहा हजार रुपयांची खंडणीही घेतली. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरून अर्नाळा सागरी
पोलीस ठाण्यात शैलेंद्र लोढा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई येथील एका व्यावसायिक महिलेची वसई मधीलच शैलेंद्र लोढा या व्यक्तीशी कामानिमित्त ओळख झाली होती. या ओळखीचें मैत्रीत रूपांतर झाल्यानंतर दोघेही भावनिकदृष्ट्या जवळ आले होते. १९ आॅगस्ट रोजी पिकनिकच्या इराद्याने दोघे दुचाकीवर कळंब आणि राजोडी येथे गेले होते. दुपारी दिड वाजता शैलेंद्रने जेवणात गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध केले.आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच बलात्काराचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले.
त्यानंतर शैलेंद्रने अश्लिल चित्रफित दाखवून पिडीत महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. पैशांसोबत त्याने तिच्याकडून वारंवार शरीरसुखाचीही मागणी केली. त्यासाठी शैलेंद्र तिला ही चित्रफित नवरा आणि भावाला दाखविण्याची धमकी देत होता. शेवटी पिडीत महिलेने कुटुंबियांना विश्वासात घेऊन सदर प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात शैलेंद्र विरोधात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर शैलेंद्र फरार झाला आहे. (वार्ताहर)