मुंबईकरांनो, सुट्टीत चला राणीच्या बागेत! १५, १६ ऑगस्टलाही प्राणीसंग्रहालय राहणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:40 PM2023-08-14T12:40:53+5:302023-08-14T12:41:59+5:30

१७ ऑगस्ट रोजी गुरुवारी राणीची बाग बंद राहणार आहे.

ranichi baug garden will be open on 15th and 16th of august also | मुंबईकरांनो, सुट्टीत चला राणीच्या बागेत! १५, १६ ऑगस्टलाही प्राणीसंग्रहालय राहणार सुरू

मुंबईकरांनो, सुट्टीत चला राणीच्या बागेत! १५, १६ ऑगस्टलाही प्राणीसंग्रहालय राहणार सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईकरांचे विरंगुळ्याचे आणि आवडते ठिकाण म्हणजे राणीची बाग होय. ही राणीची बाग सुट्टीच्या दिवशी म्हणजेच १५ आणि १६ ऑगस्ट रोजी सुरू राहणार आहे. तर १७ ऑगस्ट रोजी गुरुवारी राणीची बाग बंद राहणार आहे.

भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, पालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास त्यादिवशी वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले असते व दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते. त्यानुसार बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले राहणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन असल्याने व १६ ऑगस्ट रोजी पारशी नूतन वर्ष प्रारंभ असे दोन दिवस सुट्टीचे लागून आली आहे. या दिवशी राणीच्या बागेत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


 

Web Title: ranichi baug garden will be open on 15th and 16th of august also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.