रामगोपाल वर्मावर गुन्हा

By admin | Published: August 31, 2014 02:31 AM2014-08-31T02:31:15+5:302014-08-31T02:31:15+5:30

रामगोपाल वर्मा यांनी गणोशाबाबत वादग्रस्त वाक्ये ट्विट केल्याने बजरंग दलाचे मुलुंड येथील संयोजक रमेश गुप्ता यांनी त्यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Ramgopal Verma's crime | रामगोपाल वर्मावर गुन्हा

रामगोपाल वर्मावर गुन्हा

Next
मुंबई : गणोशोत्सव भक्तिभावाने साजरा केला जात असतानाच दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी गणोशाबाबत वादग्रस्त वाक्ये ट्विट केल्याने बजरंग दलाचे मुलुंड येथील संयोजक रमेश गुप्ता यांनी त्यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. वर्मा यांनी गणोशभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत आणि या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे रमेश गुप्ता यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, औरंगाबाद येथे टि¦टरवर आक्षेपार्ह मजकूर टाकून धार्मिक भावना भडकाविल्या प्रकरणी वर्मा यांच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  मनसेच्या वतीने क्रांतीचौक आणि उस्मानपुरा पोलीस ठाण्यात फिर्यादही देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी क्रांतीचौक ठाण्यात आज रामगोपाल वर्मा यांच्याविरुद्ध धार्मिक भावना भडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी) 

 

Web Title: Ramgopal Verma's crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.