Join us
Daily Top 2Weekly Top 5

जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत भाजपासोबत, रामदास आठवलेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 13:12 IST

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपासंदर्भात एक मोठं आणि सूचक विधान केले आहे.

मुंबई - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेससोबतच्या हातमिळवणीसंदर्भात एक मोठं आणि सूचक विधान केले आहे. 'ज्या दिशेनं हवा असेल, त्या पार्टीची साथ देणार', असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे. भाऊबीजनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. 

रामदास आठवले म्हणाले की, नसीम खान (काँग्रेस) बोलत आहेत की, तुम्ही आमच्यासोबत हातमिळवणी करा. यावर मी त्यांना म्हणालो की, मी 10-15 वर्षांपर्यंत काँग्रेससोबत होतो. इथेही (भाजपा) मला 5-20 वर्षांपर्यंत राहावं लागणार. जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत भाजपासोबत राहणार. जेव्हा हवा दिशा बदलेल तेव्हा अंदाज घेऊन मी निर्णय घेईन.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना भाजपाला आपला पाठिंबा दर्शवण्याबाबत विधान केले होते. छत्तीसगडमध्ये 83 जागांवर रिपाइं पक्ष भाजपाला समर्थन देत आहे, तर उर्वरित 7 जागांवर रिपाइंकडून उमेदवार रिंगणात उतरवले जातील, असा दावा आठवले यांनी केला होता. यादरम्यान त्यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या कार्याचंही कौतुक केले होते.

यापूर्वीही अनेकदा उलटसुलट विधानं करुन रामदास आठवले चर्चेत राहिले आहेतच, शिवाय अनेकदा त्यांनी आपल्या विधानांवरुन वाददेखील ओढावून घेतल्याचे पाहायला मिळालं आहे.  

 

 

टॅग्स :रामदास आठवलेभाजपा