Join us

राम रहीम सोशल मीडियावरील चर्चेचा केंद्रबिंदू, गेल्या पाच दिवसांपासून यूट्युबवरही ‘ढोंगी बाबा’ ट्रेंडिंगमध्ये  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 06:57 IST

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून फेसबुक, टिष्ट्वटरवर त्याच्याबाबत चर्चा रंगत होत्या. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून हा ‘ढोंगी बाबा’ यूट्युबवरही ट्रेंडिंगमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून फेसबुक, टिष्ट्वटरवर त्याच्याबाबत चर्चा रंगत होत्या. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून हा ‘ढोंगी बाबा’ यूट्युबवरही ट्रेंडिंगमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सोशल मीडियावर राम रहीमबद्दल इत्थंभूत माहिती शेअर केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.यूट्युबवर व्हिडीओंच्या माध्यमातून राम रहीमबद्दल वेगवेगळी माहिती शेअर केली जात आहे. राम रहीमचा खजिना, डेºयांवर धाडी पडून काय मिळाले? गुहेबद्दल माहिती, सिक्रेट्स, डेºयांमधील सर्च आॅपरेशन, रॉयल लाइफ अशा आश्चर्यकारक माहितीबाबतच्या व्हिडीओंना लाखो हिट्स मिळत आहेत.गेल्या चार-पाच दिवसांपासून यूट्युबवर ट्रेंडमध्ये असलेल्या व्हिडीओंमध्ये राम रहीमवरील व्हिडीओच मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहेत. या सर्व विषयांवर सोशल मीडियावर माहिती शेअर केली जात असून, त्यावर चर्चा रंगत आहेत. राम रहीमचे समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये ‘सोशल वॉर’ सुरू आहे. राम रहीमसोबत त्याच्या समर्थकांनाही ट्रोल करणारे व्हिडीओ हिट ठरत आहेत. सोबत हनीप्रीतसुद्धा ट्रेंडिंगमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. हनीप्रीतचे सिक्रेट्स, हनीप्रीतच्या खोलीत काय मिळाले? याबाबतही माहिती सर्च केली आणि शेअर केली जात आहे.राम रहीमची बॉलीवूडवर मातयूट्युबच्या ट्रेंड लिस्टमध्ये बॉलीवूडचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडच्या सिनेमांपेक्षा, गाण्यांपेक्षा राम रहीमवर तयार केलेले व्हिडीओ, ट्रोल करणारे व्हिडीओ लाखो लोक पाहत आहेत. ट्विटरच्या हॅशटॅगमध्येही राम राहीम टेÑंडमध्ये आहे.

टॅग्स :बाबा राम रहीमसोशल मीडियाभारत