मुंबई-अयोध्या थेट विमान प्रवास, IndiGo ची घोषणा; कधीपासून सुरू होईल सेवा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:17 AM2023-12-27T10:17:13+5:302023-12-27T10:19:40+5:30

दिल्ली, अहमदाबाद याशिवाय अयोध्या-मुंबई यांच्यात थेट प्रवास पर्यटन आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चालना देईल असं इंडिगोचे अधिकारी विनय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. 

Ram Mandir: Mumbai-Ayodhya direct flight, Indigo announces; When will the service start? | मुंबई-अयोध्या थेट विमान प्रवास, IndiGo ची घोषणा; कधीपासून सुरू होईल सेवा?

मुंबई-अयोध्या थेट विमान प्रवास, IndiGo ची घोषणा; कधीपासून सुरू होईल सेवा?

मुंबई - Mumbai-Ayodhya Flights ( Marathi News ) अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या उद्घाटनाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. येत्या २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आली आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी अयोध्येतील श्रीराम एअरपोर्टचं ३० डिसेंबर रोजी लोकार्पण करतील. त्यामुळे अयोध्येला जाण्यासाठी विमान प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. अयोध्येतून नवी दिल्ली आणि अहमदाबादनंतर आता इंडिगोने मुंबईतूनही थेट अयोध्येला विमान सेवा देण्याची घोषणा केली आहे. 

अयोध्या मंडल कमिश्नर गौरव दयाल यांनी सांगितले की, अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचं बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचसोबत अयोध्या ते दिल्ली, अहमदाबाद फ्लाईटची घोषणा करण्यात आली आहे. आता Indigo ने मुंबई आणि अयोध्या या विमान सेवेची घोषणा केली आहे. येत्या १५ जानेवारी २०२४ पासून ही सेवा सुरू होत असल्याने अयोध्या ते मुंबई प्रवास जलद आणि सुलभ होणार आहे. त्याआधी ६ जानेवारी २०२४ पासून दिल्ली ते अयोध्या आणि ११ जानेवारी २०२४ पासून अहमदाबाद ते अयोध्या विमान सेवा सुरू होईल. तर आम्ही दिल्ली, अहमदाबाद याशिवाय अयोध्या-मुंबई यांच्यात थेट प्रवास पर्यटन आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चालना देईल असं इंडिगोचे अधिकारी विनय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. 

Air India नेही विमान सेवा सुरू केली
याआधी एअर इंडियानेही रामभक्तांसाठी नव्या सेवेची घोषणा केली. एअर इंडिया एक्सप्रेसचं पहिलं विमान दिल्ली ते अयोध्या यामध्ये ३० डिसेंबरपासून उड्डाण घेणार आहे. त्यानंतर प्रवाशांसाठी १६ जानेवारीपासून दिल्ली अयोध्या सेवा नियमित सुरू होईल. 

दरम्यान, २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या सोहळ्यात देशातील ५ हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मागील ३५ वर्षांत श्रीराम मंदिराचा मुद्दा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला होता. या मुद्यावर भाजपने देशभर निवडणुका लढवल्या होत्या व यश प्राप्त केले होते. अयोध्येतील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देत आहेत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अनेकांनी राम मंदिरासाठी काही ना काही दान दिले आहे. 

Web Title: Ram Mandir: Mumbai-Ayodhya direct flight, Indigo announces; When will the service start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.