Join us

राम कदम, मधू चव्हाण भाजपाच्या बैठकीतून गायब  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 05:00 IST

महिलांविषयी अनुद्गार काढणारे भाजपाचे आमदार राम कदम आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालेले भाजपा नेते मधू चव्हाण हे भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतून गायबच होते. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा होती.

मुंबई - महिलांविषयी अनुद्गार काढणारे भाजपाचे आमदार राम कदम आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालेले भाजपा नेते मधू चव्हाण हे भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतून गायबच होते. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा होती. तसेच, या दोघांमुळे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना प्रश्नांचा भडिमार सहन करावा लागला.मधु चव्हाण यांच्यावर कारवाई करणार का, या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळून दानवे यांनी गौप्यस्फोट केला की, गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणाची तक्रार दीड वर्षांपूर्वीच माझ्याकडे आली होती. पोलिसांनी दोनदा चौकशी करून ते बंद केले. चव्हाणांवर पक्षाकडून कारवाईबाबत त्यांनी मौन बाळगले. कदम व्यस्ततेमुळे प्रदेश बैठकीला येऊ शकले नसतील, असे दानवे म्हणाले.

टॅग्स :भाजपाबातम्या