'भावी पिढीच्या उज्ज्वल वाटा निश्चयाने घडवुया, नव्या पिढीचा नव्या युगाचा पुढचा महाराष्ट्र घडवुया', असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढच्या महाराष्ट्राचे व्हिजन मांडणार असल्याचे जाहीर केले आहे. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्ताने मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला असून, राज ठाकरे या मेळाव्यात नव्या वेबसाईटची सुरूवात करणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे महाराष्ट्राबद्दल व्हिजन काय असणार याची चर्चा सुरू झाली आहे.
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी पुढचा महाराष्ट्र व्हिजनबद्दल संकल्प मांडला आहे.
'आपुली मायभूमी ही ऋण तिचे फेडुया, माय मराठीच्या प्रेमासाठी कष्ट सारे झेलुया. शिवबांच्या स्वराज्याचे तोरण दारी बांधुया, दिल्लीचेही तख्त झुकावे, शौर्य असे दाखवुया. कष्टकरी अन् शेतकऱ्यांच्या उपकारांना जागुया, चाकरमानी अन् उद्योगी साऱ्यांना सोबत घेऊया. भावी पिढीच्या उज्ज्वल वाटा निश्चयाने घडवुया, नव्या पिढीचा नव्या युगाचा पुढचा महाराष्ट्र घडवुया', असा मेसेज या व्हिडीओतून देण्यात आला आहे.
मनसेचे नवे व्हिजन, पुढचा महाराष्ट्र
राज ठाकरे मनसेच्या मेळाव्यात 'महाराष्ट्र पुढचा' या नव्या वेबसाईटची सुरुवात करणार आहेत. महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंचे व्हिजन यातून मांडले जाणार आहे. काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट प्रसिद्ध केली होती. आता नवी कल्पना राज ठाकरे महाराष्ट्रासमोर मांडणार आहेत.
शिवाजी पार्कवर मेळावा
दरवर्षी प्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा सायंकाळी पार पडणार आहे. सहा वाजता मेळाव्याला सुरूवात होणार आहे. या मेळाव्याची तयारी करण्यात आली असून, मनसे आणि उद्धवसेने यांची युती झाल्यानंतरचा हा पहिलाच मेळावा कार्यक्रम आहे. त्यामुळे उद्धवसेनेचेही नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.
Web Summary : Raj Thackeray launched a website to showcase his vision for Maharashtra's future. He aims to create a progressive state, focusing on youth and development. The vision will be presented at a MNS rally at Shivaji Park.
Web Summary : राज ठाकरे ने महाराष्ट्र के भविष्य के लिए अपना विजन दिखाने के लिए एक वेबसाइट लॉन्च की। उनका लक्ष्य युवाओं और विकास पर ध्यान केंद्रित करते हुए एक प्रगतिशील राज्य बनाना है। विजन शिवाजी पार्क में एक एमएनएस रैली में प्रस्तुत किया जाएगा।