Join us  

Raj Thackeray: अण्णा होते कुठे इतके दिवस?; राज ठाकरेंचा एका वाक्यात चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 2:44 PM

भाजपने केलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे सरकार संध्याकाळपर्यंत मंदिरं उघडण्याचे आदेश देईल, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात म्हटलं होतं. मात्र, अद्यापही सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिली नाही.

ठळक मुद्देअण्णा हजारेंनीही इशारा दिलाय, यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, अण्णांना चिमटाही काढला. अण्णा होते कुठे इतके दिवस?, असे म्हणत राज यांनी अण्णांच्या आंदोलन इशाऱ्यावर चिमटा काढला.

मुंबई - कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातील मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही सरकारला 10 दिवसांचा अल्टीमेटम देत जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. अण्णांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. आता, मनेसप्रमुख राज ठाकरेंनी अण्णांना एकाच वाक्याच चिमटा काढल्याचं दिसून आलं.

भाजपने केलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे सरकार संध्याकाळपर्यंत मंदिरं उघडण्याचे आदेश देईल, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात म्हटलं होतं. मात्र, अद्यापही सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिली नाही. आता मंदिर उघडण्यात येत नसल्याच्या सरकारच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने लवकरच मंदिरं न उघडल्यास आम्ही मंदिराबाहेर घंटनाद आंदोलन करणार असल्याचं राज यांनी सांगितलं. तसेच, अण्णा हजारेंनीही इशारा दिलाय, यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, अण्णांना चिमटाही काढला. अण्णा होते कुठे इतके दिवस?, असे म्हणत राज यांनी अण्णांच्या आंदोलन इशाऱ्यावर चिमटा काढला. 

अण्णांच्या आंदोलनास भाजपचा पाठिंबा

भाजपकडून मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. आता, या बहिऱ्या सरकारला ऐकू येईल ही अपेक्षा आहे. मंदिर उघडी करा, नियम ठरवा, निवडक संख्येत लोकांना मंदिराच्या आत सोडावे. नियमांचं पालन भाविकांनी केलं पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. तसेच, अण्णा हजारे निर्भीड व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आम्हीही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असेही पाटील यांनी सांगितले. 

अण्णांचा सरकारला इशारा

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सरकारवर संतापले. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे, असेही अण्णांनी म्हटले, तसेच सरकारला इशाराही दिला.   

टॅग्स :अण्णा हजारेराज ठाकरेचंद्रकांत पाटीलमंदिरमनसे