Join us
Daily Top 2Weekly Top 5

'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो'; राज ठाकरेंची खोचक टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 13:48 IST

यापूर्वीही राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशिन्सबाबत साशंकता व्यक्त केली होती.

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून निकालांवर खोचक भाष्य केले आहे. ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. यापूर्वीही राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशिन्सबाबत साशंकता व्यक्त केली होती. त्यामुळे आता भाजपाचे नेते या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :कर्नाटक निवडणूक निकाल २०१८राज ठाकरे