राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून केलं मोदींना लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 09:44 PM2019-01-01T21:44:37+5:302019-01-01T21:44:43+5:30

मोदींच्या मुलाखतीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य केलं आहे.

Raj Thackeray a target to Modi's from cartoon | राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून केलं मोदींना लक्ष्य

राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून केलं मोदींना लक्ष्य

Next

मुंबईः मोदींच्या मुलाखतीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य केलं आहे. राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र रेखाटलं असून, या व्यंगचित्रात 2014 ते 2018चा काळ दाखवण्यात आला आहे. या व्यंगचित्रात एक वयोवृद्ध माणूस एका लहान मुलाच्या हातात(पॉवर की) किल्ली देत असल्याचं पाहायला मिळतंय. बेटा, खूप त्रास सहन केला रे आम्ही! आम्ही जी चूक केली तशी तू करू नकोस, जबाबदारीनं वागशील ही अपेक्षा, असा मजकूरही या व्यंगचित्रातून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे व्यंगचित्र काढण्यात आले आहेत. हे व्यंगचित्र राज ठाकरेंच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर पेजवर पोस्ट करण्यात आले आहे. या व्यंगचित्राच्या राज ठाकरेंच्या फेसबुक पोस्टवर वाचकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या व्यंगचित्राला आतापर्यंत 700हून अधिक लोकांनी शेअर केलं असून, जवळपास दीडशेच्या वर कमेंट्स आहेत.

2014ला मोदी सत्तेवर येण्यापूर्वीपर्यंत राज ठाकरेंनी मोदीच पंतप्रधान व्हावेत, अशी जाहीर सभेत विधानं केली होती. परंतु मोदी सत्तेवर आल्यानंतर ते त्यांच्या विरोधात बोलू लागले. त्यामुळेच आता 2019ला मोदींची सत्ता जाणार असंच जणू काही राज ठाकरेंना या व्यंगचित्रातून सुचवायचं आहे, असाच कयास बांधला जात आहे.  

Web Title: Raj Thackeray a target to Modi's from cartoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.