Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचे नवे व्यंगचित्र; मोदींच्या फिटनेस चँलेजची उडवली खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 20:38 IST

राज ठाकरेंच्या यापूर्वीच्या व्यंगचित्रांना भाजपाकडून तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात आले होते.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या फेसबूक पेजवर नवे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस चँलेंजची खिल्ली उडविली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिलेले फिटनेस चँलेज पूर्ण करतानाचा व्हीडिओ मोदींनी नुकताच ट्विटरवरून पोस्ट केला होता. यावरून सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल झाली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांनीही आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून यावर टिप्पणी केली. राज यांच्या व्यंगचित्राच्या दुसऱ्या भागात देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिक म्हणून एक झाड दाखवण्यात आले आहे. हे झाड जातीपातीच्या विषवल्लींनी वेढलेले आहे. या झाडाकडे बघून मराठी माणूस देवेंद्र फडणवीसांना जातीपातीच्या विषवल्ली छाटण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.  राज ठाकरेंच्या यापूर्वीच्या व्यंगचित्रांना भाजपाकडून तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्यामुळे आता या व्यंगचित्रावर भाजपा काय पवित्रा घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेनरेंद्र मोदी