world environment day: जुन्याच 'ब्लू प्रिंट'मधून राज ठाकरेंचा 'ग्रीन' संदेश... बघा, कसा साधता येईल विकास-पर्यावरणाचा मेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 15:06 IST2018-06-05T15:06:05+5:302018-06-05T15:06:05+5:30
पर्यावरणाचा समतोल राखून शहरांचा विकास कसा करता येईल.

world environment day: जुन्याच 'ब्लू प्रिंट'मधून राज ठाकरेंचा 'ग्रीन' संदेश... बघा, कसा साधता येईल विकास-पर्यावरणाचा मेळ
मुंबई: आज जगभरात साजऱ्या होत असलेल्या पर्यावरण दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. मनसेच्या बहुचर्चित विकास आराखड्याची ब्ल्यू प्रिंट सादर करताना हा व्हीडिओ तयार करण्यात आला होता. त्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखून शहरांचा विकास कसा करता येईल. तसेच या सगळ्या निर्मितीमध्ये सौदर्यंशास्त्र कसे महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न राज यांनी केला आहे.
आरेच्या जंगलात प्रस्तावित असलेली मेट्रो-2 ची नियोजित कारशेड असो किंवा समृद्धी महामार्ग अथवा नाणारचा तेलशुद्धीकरण प्रकल्प असो, या सर्वांनाच मनसेने पर्यावरणाच्या मुद्द्यावरून विरोध केला आहे. त्याच अनुषंगाने राज यांनी पुन्हा एकदा ट्विटरवर पर्यावरणाविषयीची भूमिका सविस्तरपणे मांडली आहे.
Our city,villages,rivers, roads,forests.The day we start looking at this as our own, and begin to look after them in a befitting way, that day would be the real celebration of #WorldEnvironmentDay
— Raj Thackeray (@RajThackeray) June 5, 2018
In 2014, in a docu-film, I had stated this. Do have a look.https://t.co/doEXGpozC4