Join us  

अवनीची शिकार करणाऱ्या सरकारवर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 7:14 PM

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कथित नरभक्षक वाघीण अवनीच्या हत्येवरून राज्य सरकारला फटकारले आहे. 

मुंबई -  मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी ऐन दिवाळीमध्ये व्यंगचित्रांच्या माध्यमातून मारलेले फटकारे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या चांगलेच झोंबले होते. आता राज ठाकरे यांनी कथित नरभक्षक वाघीण अवनीच्या हत्येवरून राज्य सरकारला फटकारले आहे. राज ठारके यांनी दोन भाग असलेले व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यातील पहिल्या भागात  माज आलेल्या सरकारने अवनीची हत्या घडवून आणल्याचे राज ठाकरे यांनी मांडले आहे. आता चवताळलेला व्याघ्ररूपी महाराष्ट्र 2019 साली राज्यातील माजोरड्या युती सरकारची शिकार करेल, असा इशारा राज ठाकरेंनी दुसऱ्या भागातूव दिला आहे.  अवनी या वाघिणीने पांढरकवडा, कळंब, राळेगाव या तीन तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला. अवघ्या काही महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली होती. मात्र नरभक्षक असल्याच्या संशयावरून अवनी वाघिणीच्या करण्यात हत्येबाबत प्राणीप्रेमींकडून तीव्र संताप होत आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेराजकारण