Join us

अंगठी, बकरी विकून पैसे जमवले, पण विमान उड्डाण झाले रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 03:50 IST

विमान कंपनीला समजताच १ जून रोजी विमानातून अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांना कोलकाता पोचवण्याचा निर्णय कंपनीने आता घेतला आहे.

मुंबई : लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या तिघांनी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. बकरी, सोन्याची अंगठी विकून पैसे जमवून विमान प्रवासासाठी गोळा केले. मुंबईतून कोलकाताला जाण्यासाठी तिकीट आरक्षित केले. मात्र पश्चिम बंगाल सरकारने २८ मेपर्यंत देशांतर्गत विमान प्रवासावर बंदी घातल्याने त्यांचे विमान हवेत उडू शकलेच नाही. हे संबंधित विमान कंपनीला समजताच १ जून रोजी विमानातून अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांना कोलकाता पोचवण्याचा निर्णय कंपनीने आता घेतला आहे.

रहिमा खातून, फरीद मोलाह व सोना मोलाह हे बंगलाच्या मुशीराबाद जिल्ह्याचे मुळ रहिवासी आहेत. विमान प्रवासासाठी ३०,६०० रुपये जमवले. रहिमाने त्यासाठी हातातील सोन्याची अंगठी विकली, फरीदने पैसे उधार घेतले व काही बचतीमधून वापरले. त्याच्या पत्नीने तीन बकऱ्या विकून आलेले सुमारे ९६०० रुपये पतीच्या खात्यात जमा केले.

दिव्यात राहणाºया या तिघांनी दोन हजार रुपये खर्चून विमानतळ गाठले, मात्र तेथे गेल्यावर विमान रद्द झाल्याची माहिती त्यांना मिळाली. ते निराश झाले. आता एक जून रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या विमानाने त्यांना कोलकाता येथे पाठवण्यात येईल, असे विमान कंपनीने जाहीर केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याविमान