पावसाचा अवेळी धिंगाणा ; दिवाळी खरेदीवर फिरविले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:56 IST2017-10-15T01:56:43+5:302017-10-15T01:56:46+5:30

मुंबईकरांना आॅक्टोबर हीटचा तडाखा बसत असतानाच, अवेळी पाऊस सुरू झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर बाजार रंग, रांगोळी, आकाश कंदील यांनी सजले असतानाच, पाऊस सुरू झाल्याने मुंबईकरांसह विक्रेत्यांचा हिरमोड झाला आहे.

Rains uneven; Repeat water on Diwali shopping | पावसाचा अवेळी धिंगाणा ; दिवाळी खरेदीवर फिरविले पाणी

पावसाचा अवेळी धिंगाणा ; दिवाळी खरेदीवर फिरविले पाणी

मुंबई : मुंबईकरांना आॅक्टोबर हीटचा तडाखा बसत असतानाच, अवेळी पाऊस सुरू झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर बाजार रंग, रांगोळी, आकाश कंदील यांनी सजले असतानाच, पाऊस सुरू झाल्याने मुंबईकरांसह विक्रेत्यांचा हिरमोड झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, दिवसभर कडाक्याचे ऊन आणि मावळतीला कोसळधारा, असे दुहेरी वातावरण मुंबईत आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे मुंबईकर हैराण झाले असून, शनिवारी संध्याकाळीदेखील कोसळणाºया मुसळधार सरींनी मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली.
शनिवारी सकाळी मुंबई आणि उपनगरात पावसाचे ढग दाटून आले होते. परिणामी, मोठा पाऊस कोसळेल, असे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्यक्षात मात्र, पावसाने पाठ फिरविली. दुपारी पावसाचे ढग हटले आणि सूर्यकिरणांनी मुंबईकरांना चटके दिले. दुपार टळली आणि सूर्य क्षितिजावर उतरतो, तोच पुन्हा शहरासह उपनगरावर पावसाचे ढग दाटून आले. सायंकाळी ५ नंतर मिट्ट काळोख दाटून आला आणि मध्य मुंबईसह लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. अचानक दाखल झालेल्या सरींनी मुंबईकरांची तारांबळ उडाली. रस्त्यावरच दिवाळीचे कंदील, रंग विकण्यासाठी बसणाºया विक्रेत्यांना आडोशाचा आधार घ्यावा लागला. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. १५ आॅक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील दोन दिवस पावसाचे
रविवारसह सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. शहर आणि उपनगरात सायंकाळसह रात्री मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.

Web Title: Rains uneven; Repeat water on Diwali shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस