Join us

Maharashtra Election 2019: एकगठ्ठा मतदानासाठी आश्वासनांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:03 IST

Maharashtra Election 2019: काही ठिकाणी या सोसायट्यांनी विविध कामांची मागणी केली आणि सर्वच ठिकाणी आश्वासने देत उमेदवारांनी वेळ मारून नेली.

मुंबई : एका ठिकाणच्या मतदारांनी आपल्यालाच एकत्रित मतदान करावे, यासाठी अनेक उमेदवारांनी प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्या व अपार्टमेंटमध्येसुद्धा धावती भेट दिली. तेथील मतदारांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

काही ठिकाणी या सोसायट्यांनी विविध कामांची मागणी केली आणि सर्वच ठिकाणी आश्वासने देत उमेदवारांनी वेळ मारून नेली. दहिसर, बोरीवली, मागाठाणेच्या काही प्रभागांत छुप्या प्रचारात उमेदवारांकडून प्रभागातील विविध भागांत मतदारांची वैयक्तिक भेट घेण्यावर भर देण्यात आला. विविध सामाजिक, धार्मिक मंडळांच्या भेटीही असंख्य उमेदवारांनी घेतल्या.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मतदान